Header Ads

बालाजीतर्फे धगधगत्या उन्हात मुलांना कलिंगडचे वाटप; कोरोनाच्या संकटातही अपंग, दिव्यांगांना मदत करा : रमेश उबाळे satara

सातारा : कोरोनाशी दोन हात करून समाजातील अपंग, दिव्यांग घटकांना न विसरता  मदत केली पाहिजे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी केले आहे.
   
जिल्ह्यात बांधकाम व्यवसायात कार्यरत असणाऱ्या बालाजी कन्स्ट्रक्शन व कृषी तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे धनंजय पाटील यांचे सौजन्याने वाघजाईवाडी ता. कोरेगाव येथील आशाग्राम दिव्यांग  मुलांचे शासकीय संमत केंद्र तसेच सातारा येथील अशाग्राम येथील दिव्यांग व अपंग मुलांना  कलिंगड वाटप करण्यात आले.  त्यावेळी रमेश उबाळे बोलत होते.
       
रमेश उबाळे पुढे म्हणाले, दोन हात कोरोनाशी एक पाऊल मदतीचे हा मंत्र जपत कोरोनाच्या संकटात काम केले पाहिजे. कोरोनाचे संकट मोठे जरूर  आहे परंतु या काळातही माणुसकी जपत कोरोनला आपणास हरवायचे आहे.  समाजातील सक्षम लोकांना अपंग, दिव्यांगासाठी मदतीचा हात दिला पाहिजे.
         
कोरोनाची साथ सुरू आहे. घराबाहेर पडणेही सध्या मुश्किल झाले आहे. परंतु मी घरामध्ये जरी असलोतरी मला या मुलांची आठवण कायम येत होती. सध्या उन्हाळा सुरू आहे. धगधगते उन्ह आहे.आमचे सहकारी मित्र धनंजय पाटील, गणपत घाडगे  विक्रम माने यांचेकडे मी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर त्यांनी होकार दर्शविला आम्ही या ठिकाणी येऊन या मुलांना कलिंगड दिल्यानंतर आज मानसिक समाधान मिळाल्याचेही यावेळी नमूद करत रमेश उबाळे म्हणाले, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा वाढदिवस या मुलांसोबत साजरा करतो. मी देवाला जरूर मानतो परंतु प्रत्यक्ष देव मला अंध, अपंग,दिव्यांगामध्ये दिसतो म्हणून आज या बोरजाईवाडी, सातारा येथील या मुलांमध्ये आल्यानंतर मंदिरात आल्यासारखे वाटत आहे.कोरोनाचे संकट जरी आले असले तरी या घटकांकडेही शासनाने, समाजाने लक्ष देणे अधिक गरजेचे आहे.यावेळी रमेश उबाळे, धनंजय पाटील, गणपत घाडगे, विक्रम माने यांचे हस्ते कलिंगड देण्यात आले.दरम्यान सर्वच मुलांनी कलिंगडचा आस्वाद घेत रमेश उबाळे, धनंजय पाटील यांचे धन्यवाद व्यक्त करत आशीर्वाद देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

परंतु  राजकारण, समाजकारणात नव्हतो तेव्हापासून समाजातील दुरबल घटकांविषयी आस्था आहे. काही माझे हितचिंतक माझ्यावर प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप करतात परंतु आजोबा-पणजोबापासून आम्ही हे पुण्य करतआहे  परंतु माझ्यावर  आरोप करणारानी  कधीतरी आपल्या खिशात हात घालावा असे आवाहनही उबाळे यांनी त्यांचे राजकीय हितशत्रूंना  यावेळी बोलताना केले. 

No comments