Header Ads

२१ जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर २६२ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील 262 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे एन.सी.सी.एस.पुणे यांनी कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

21 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 21 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली. आत्तापर्यंत जिल्ह्यात 516 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 158 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 338 रुग्णांवर उपचार सुरु असून 20  जणांचा मृत्यु झालेला आहे.

No comments