Header Ads

घरपोच किराणा माल पोहोच करण्याबाबत सुधारीत आदेश जारी satara

सातारा : सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहूपुरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर, समर्थनगर, धनगरवाडी या ग्रामपंचायत क्षेत्रात व सातारा नगरपालिका व त्रिशंकू  क्षेत्रात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने गावांमध्ये व सातारा नगर पालिका हद्दीमधील प्रभाग निहाय दुकानदार यांना किरणा माल घरपोच करण्यासाठी यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. परवानगी देण्यात आलेल्या किराणा माल दुकानदारांनी दुकानातून आटा (गव्हाचे पीठ), तांदूळ, ज्वारीचे पीठ, डाळ, कडधान्य, मीठ, तेल, तिखट, चहा पावडर, साखर, बेसन पीठ, पोहे, साबण, शेंगदाणे, गूळ, रवा, मैदा, भगर, शाबुदाणा, सॅनिटायझर, मसाले पदार्थ या वस्तुंचीच विक्री करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा इन्सिटंट कमांडर, सातारा मिनाज मुल्ला यांनी सुधारीत आदेश जारी केले आहेत.

No comments