Header Ads

केशरी कार्डधारकांनाही मिळणार स्वस्त धान्य : जिल्हाधिकारी शेखर सिंह satara

सातारा : केशरी शिधापत्रिकाधारकांना ( प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेत सहभागी नसणारे) प्रती सदस्य 3 किलो गहू रु. 8/- दराने व 2 किलो तांदूळ रु. 12/- दराने स्वस्त धान्य माहे मे मध्ये  वाटप करण्यात येणार आहे. यासाठी  शिधापत्रिकाधारकांनी आपली मूळ शिधापत्रिका सोबत धान्य दुकानदराकडे घेऊन जावी.  आपल्या मूळ केशरी शिधापत्रिकेवर नमूद रास्तभाव धान्य दुकानातून हे धान्य   घेऊन जावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. माहे एप्रिल 2020मध्ये 8772.281 मे. टन धान्य वाटप करण्यात आले आहे. तसेच माहे एप्रिल 2020 साठीचे प्रधनमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील विनामूल्य धान्य प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरु असून, आतापर्यंत 8518.879 मे. टन धान्य वाटप करण्यात आले आहे. मे महिन्याचे नियिमत दराचे गहू  व तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. याचबरोबर अंत्योदय अन्न योजनेतील प्रती शिधाप्रत्रिकाधारक यांना प्रती शिधापत्रिका 10 कि. तांदूळ व 15 कि. गहू वाटपाबरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील प्रती लाभार्थी 5 कि. प्रमाणे विनामुल्य धान्य वाटप  दि. 11 ते 25 मे या कालावधीत केले जाणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

No comments