Header Ads

सातारा रेड झोनमध्ये satara

सातारा : सातारा जिल्ह्यात तब्बल  52 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा देखील आता रेड झोनमध्ये गेला आहे. केंद्रीय गृह सचिव प्रीती सुडान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन देशभरातील जिल्ह्यांचे वर्गीकरण रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आले आहे.

प्रत्येक राज्याने त्यानुसार रेड आणि ऑरेंज झोनच्या क्षेत्रात कंटेनमेंट झोन आणि बफर झोनच्या हद्दी निश्चित करून केंद्र शासनाला सूचित करावे. कोणत्याही जिल्ह्याला तोपर्यंत ग्रीन झोन मानण्यात येणार नाही. जोपर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सलग २१ दिवस नव्याने कोरोनाने बाधित झाल्याचे एकही केस नसेल. शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये देशभरातील १३० जिल्हे रेड झोन मध्ये, २८४ जिल्हे ऑरेंज झोन मध्ये तर ३१९ जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र व अन्य क्षेत्रांना वेगवेगळे वर्गीकरण करता येऊ शकेल. रेड किंवा ऑरेंज झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्र व तालुका क्षेत्र अशी विभागणी करून ज्या ठिकाणी मागील २१ दिवसात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसेल अशा ठिकाणी झोनचा दर्जा कमी करता येईल. आज जाहीर केलेल्या यादी मध्ये महराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये, १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर ६ जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये करण्यात आला आहे. रेड, ऑरेंज व ग्रीन झोन क्षेत्रात लॉकडाऊन संदर्भातील नियमावली येत्या ३ मे रोजी घोषित केले जाईल.

झोन निहाय्य जिल्ह्यांचे वर्गीकरण

रेड झोन : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, पालघर, यवतमाळ, धुळे, अकोला आणि जळगाव

ऑरेंज झोन : रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा आणि बीड

ग्रीन झोन : उस्मानाबाद, वाशीम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचीरोली आणि वर्धा.

No comments