Header Ads

दोन मृत व्यक्तींसह २३ जणांची नमुने पाठविले तपासणीला तर ११७ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह satara

सातारा : फलटण तालुक्यातील होळ येथील 84 वर्षीय महिला व तांबवे येथील 94 वर्षीय पुरुष यांचा काल दि.28 मे रोजी मृत्यु झाला आहे. या दोघांचा कोविड संशयित म्हणून घशातील स्त्रावांचा नमुने तपासणीकरिता, पुणे येथे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. काल रात्र उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 23 जणांचे घशातील स्त्रावांचा नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर 177 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

No comments