Header Ads

मदत नाही हे आमचं कर्तव्य; प्रा.सुजाता पवार यांनी लेकीच्या वाढदिवसानिमित्त केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप satara

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या ईस्माइल साहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या प्राचार्या पदाची धुरा डॉ.सौ.सुजाता पवार या सक्षमपणे सांभाळत आहेत. कर्मवीर अण्णांच्या सामाजिक जाणीवेच्या विचारातून सौ.सुजाता पवार या कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौ.सुजाता पवार यांनी आपल्या लेकीचा वृषाली उर्फ राई हिचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसानिमित्त समाजातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. आम्ही हे मदत म्हणून न्हवे तर आमच्या पवार व पाटील कुटुंबियांचे कर्तव्य म्हणून वाटप करतोय असे यावेळी सौ.पवार म्हणाल्या.

कोरोनामुळे कष्टकरी, मजूर व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी समाजातील अनेक दानशूर व सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सौ.पवार यांनी आपल्या लेकीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला व लगेच कुटुंबियांकडून गरजू लोकांना मदत करण्याची कल्पना सुचली. त्यानुसार पवार व पाटील कुटुंबियांनी जीवनावश्यक वस्तूंचे कीट बनवण्याची लगबग सुरु केली. या सर्व कार्यात त्यांना मोलाचे सहकार्य लाभले ते गणेश जाधव यांच्या शिवगंध प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व सहकाऱ्यांचे. आपल्या लेकी आगळ्या-वेगळ्या शुभेच्छा देणाऱ्या पवार व पाटील कुटुंबियांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

२२ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शिवगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडून समाजातील गरीब व गरजूंना अन्नदान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे काम अखंड सुरु आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील शिवगंध प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे देखील प्रा.सुजाता पवार यांनी अभिनंदन करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments