Header Ads

रस्त्यावर थुंकणाऱ्यांना भरावा लागणार दंड, भोगावी लागणार शिक्षा satara

सातारा : कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासह थुंकणे व धुम्रपानास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाऱ्यास मुंबई पोलिस अधिनियमानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड आणि एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड व ५ दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे.

1 comment:

  1. अरे मग आता पर्यंत 200 कसला दंड थोत्वात होता

    ReplyDelete