Header Ads

सातारा जिल्ह्यातून आता पर्यंत चार रेल्वेतून पाच हजार श्रमिक पाठवले satara

सातारा : उत्तरप्रदेशकडे 1 हजार 300 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज सायंकाळी 5 वाजता साताऱ्यातून रवाना झाली. उत्तरप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने   मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले. सातारा परिवहन  विभागाच्या बसमधून मंजुरी मिळालेल्या कामगारांना रेल्वे स्थानकावर नेहून त्यांना रेल्वे तिकीटे  देण्यात आली. प्रशासनाने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येक मजुराच्या चेहऱ्यावर जाणवत होता.  सातारच्या तहसीलदार आशा होळकर, जावलीचे तहसीलदार शरद पाटील यांच्यासह उपस्थित असलेल्या मान्यवरांबरोबरच रेल्वेत बसलेल्या मजुरांनीही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. आजपर्यंत सातारा रेल्वेस्थानकातून 4 श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत.  यामध्ये मध्य प्रदेश साठी 1, राजस्थान 1 व उत्तर प्रादेशकडे 2 श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातून 5 हजार परप्रांतीय मजुर हे श्रमिक विशेष रेल्वेच्या माध्यमातून आपल्या राज्यात गेले आहेत.

No comments