Header Ads

सुरीने सपासप वार करून पुतण्याकडून चुलत्याची हत्त्या crime

मायणी : माण तालुक्यातील कुकुडवाड (कारंडेवाडी) येथे घरगुती वादातून पुतण्यानी चुलत्याचा गळ्यावर सुरीने सपासप वार करून खून केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडकीस आली आहे. लक्ष्मण अण्णा चव्हाण (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी संदीप वसंत चव्हाण(वय 26) हा घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिस आरोपीचा कसून तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी लक्ष्मण चव्हाण, संदीप चव्हाण आणि त्याचे वडील वसंत चव्हाण हे सर्वजण एकाच कुटुंबात राहत होते. यातील मयत व आरोपी यांच्यात सतत दारू पिऊन वादातून त्यांच्यात अनेकवेळा मारहाण झाली होती. साेमवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपले. संदीप याने दारूच्या नशेत घरासमोर झोपलेल्या आपल्या चुलत्याच्या गळ्यावर सुरीने सपासप वार करून तेथून पळ काढला. लक्ष्मण यांना खोलवर जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती म्हसवड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस शिवारात शोधण्याचा प्रयत्न केला. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक श्री. महामुनी यांनी भेट देऊन आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशा सूचना केल्या आहेत. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन वाघमोडे करीत आहेत.

No comments