Header Ads

कृष्णा नदी पात्रात वाळू उपसा करताना दोघांना पकडले; डंपरसह २५ लाखांचा ऐवज जप्त crime

सातारा : धोम (ता. वाई) येथील कृष्णा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा करताना स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार ब्रास वाळू, डंपरसह सुमारे २५ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. हद्य लोकनाथ कश्यप (वय २४, रा. सह्याद्रीनगर, वाई), दिगंबर नारायण पवार (वय २१, रा. बावधन ता. वाई) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. वाई पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दि. २९ रोजी मध्यरात्री धोम (ता. वाई,) गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पात्रात जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला तत्काळ कृष्णा नदी पात्रात छापा टाकण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी तेथे गेल्यानंतर वरील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर वाळू उपशाचा कसलाही परवाना त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून जेसीबी, डंपर आणि चार ब्रास वाळू असा १५ लाख १२ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार विलास नागे, आनंदराव भोईटे, मोहन नाचन, संतोष जाधव, गणेश कापरे, वैभव सावंत, गणेश कचरे, विजय सावंत यांनी या कारवाईत भाग घेतला.

No comments