Header Ads

सातारा शहरालगत सायकल लपवल्याच्या कारणातून युवकाचा खून crime

सातारा : सातारा शहरालगत वाढे फाटा येथे बुधवारी रात्री डोक्यात दगड घालून एकाचा मर्डर झाला. मृत वाढे गावचा असून, संशयित आरोपी मुळचा नाशिक जिल्ह्यातील असून तो सद्या वाढे फाटा येथील हॉटेलमध्ये काम करत आहे. दरम्यान, बुधवारीच दारूला परवानगी मिळाल्यानंतर ही पार्टी झाली असून सायकल लपवल्याच्या कारणातून खून झाला असल्याचे समोर येत आहे. दीपक दय्या (वय २९, सध्या रा. वाढे फाटा. मूळ रा. नाशिक) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो सद्या साई ढाबा येथे वेटर म्हणून काम करत आहे. सूरज निगडे (वय ३५, रा. वाढे) या युवकाचा खून झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री या दोघांसह त्यांचा आणखी एक मित्र सोबत होता. बुधवारी दारु विक्रीसाठी खुली झाल्यानंतर त्यांनी पार्टीचे नियोजन केले. यासाठी महामार्गालगत एका झाडाखाली तिघांनीही दारु पिली. त्यांच्यात सायकल लपवल्यावरून वाद झाला. यातूनच संशयित आरोपी याने दगड डोक्यात घातला. या घटनेत सूरज निगडे जागीच गतप्राण झाला. रात्री उशिरा ही घटना समोर आल्या नंतर पो.नि. सजन हंकारे, पोलिस हवालदार दादा परीहार, सुजित भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

No comments