Header Ads

55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या शिक्षकांना कोराना संदर्भात कामकाज देण्यात येवू नये : जिल्हाधिकारी शेखर सिंह satara


सातारा : काही शिक्षकांना कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी विविध प्रकारचे कामकाज सोपविण्यात आले आहेत, ज्या शिक्षकांचे वय 55 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा शिक्षकांना कोरोना संदर्भातले कामकाज देण्यात येवू नये, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.

ज्यांचे वय 55 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा शिक्षकांना कामकाज दिले असल्यास त्यांना दिलेले आदेश तात्काळ रद्द करण्यात येवून पर्यायी व्यवस्था करावी. कोरोना संदर्भातील कामकाज देताना एका शिक्षकास जास्तीत जास्त 15 दिवस कामकाज देण्यात यावे. 15 दिवसांपेक्षा जास्त कामकाज देण्यात येवू नये. तसेच ज्या शिक्षकांना ह्दयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, असे आजार आहेत, अशा शिक्षकांना त्यांचे वय 55 वर्षापेक्षा कमी असले तरी त्यांना कोरोना संदर्भात कामकाज देण्यात येवू नये, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.

No comments