Header Ads

सातारा नगर परिषद हद्दीतील सदरबझारचे एक किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधीत व तीन किलोमीटर क्षेत्र बफर झोन म्हणून घोषीत satara

सातारा : सातारा नगर परिषद हद्दीतील सदरबझार येथे कोरोना संक्रमीत रुग्ण आढळल्याने ते केंद्र स्थान धरुन 1 किमी चा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र व केंद्र स्थान धरुन 3 कि.मीचा परिसर बफर क्षेत्र म्हणून उपविभागीय दंडाधिकारी मिनाज मुल्ला यांनी घोषीत केला आहे.

कोरोना विषाणुचा संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करुन बाधित रुग्णाने प्रवास केलेला असल्याने सातारा नगर पालिका हद्दीतील सदरबझार येथील हद्द केंद्र स्थान धरुन 1कि.मी. चा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र व केंद्र स्थानी धरुन 3 कि.मी. चा परिसर बफर क्षेत्र म्हणून दंडाधिकारी मिनाज मुल्ला यांनी घोषीत केला आहे.

No comments