Header Ads

वाधवान बंधू सीबीआयकडून अटकेत satara

सातारा : अनेक घोटाळयात आरोपी असलेले उद्योगपती वाधवान यांना आज (ता.२६) सीबीआयने अचानक अटक करत महाबळेश्वर येथून मुंबईकडे नेले. दैनिक पुढारीच्या आक्रमक पत्रकारितेच्या इतिहासातील हा मोठा दणका आहे. कपिल आणि धीरज वाधवान हे अनेक घोटाळयात संशयित आहेत. गृह विभागाच्या सचिवांचे पत्र घेऊन संचारबंदी तुडवत ते महाबळेश्वरला आले. मात्र सातारा पोलिस दलाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ते 14 दिवस इन्स्टिट्यूटनल क्वारनराईन मध्ये होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. महाबळेश्वर येथील दिवाण व्हिला या त्यांच्या बंगल्यात ते होते. वाधवान सारख्या उद्योगपतींना वेगळा न्याय व सामान्य जनतेला वेगळा न्याय यावर पुढारीने तपास यंत्रणांवर कोरडे ओढले होते. पुढारीने सर्वच यंत्रणांची पिसे काढली होती. रविवारी सकाळी अचानक सीबीआय पथक महाबळेश्वर येथे दाखल झाले. त्यांनी कपिल व धीरज वाधवानना ताब्यात घेतले. सातारा पोलिस दलाने त्यांना सीबीआयच्या ताब्यात दिले. सोबत ३ कर्मचारीही दिले. सीबीआयने त्यांना अटक केली असून मुंबईला नेले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून अटकेला दुजोरा दिला आहे.

No comments