Header Ads

पालिका प्रशासनाने ३ महिन्यांची करमाफी करावी; श्रीकांत कांबळे यांची पालिका प्रशासनाकडे मागणी satara

सातारा : लॉकडाऊनमुळे समाजातील प्रत्येक घटकाचे नुकसान झाले आहे. १ महिन्यापासून व्यापाऱ्यांचे उद्योग ठप्प आहेत.त्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या हाताला देखील काम नाही.त्यामुळे सातारा शहरातील नागरिकांना सर्व करांमधून किमान २५% (तीन महिने) सूट मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत उर्फ पप्पू कांबळे यांनी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनास केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, कोरोनाच्या साथीमुळे सर्व लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे उद्योगधंदे बंद असल्याने लोकांच्या हाताला काम नाही शहरात जमावबंदी आदेश लागू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यापुढे देखील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनमुळे पालिका क्षेत्रातील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनमुळे आपल्या    पालिका क्षेत्रात कोणत्या हि प्रकारचा (अत्यावश्यक सेवा वगळून) व्यापार उद्योग आणि देवाण-घेवाण पूर्णपणे ठप्प आहे. आपल्या सातारा नगरीत कामगारांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शहरातल्या लोकांचे दरडोई उत्पन्न मागील महिन्यात एकदम कमी झाले आहे. शहरातील नागरिकांची आर्थिक स्थिती पूर्णपणे खालवली आहे. आर्थिक वर्षाचे करसंकलन मार्च महिन्यात भरला जातो, मात्र लॉकडाऊन कालावधीत पालिकेचे सर्व प्रकारचे करसंकलन न भरल्याने नागरिकांवर आजून आर्थिक भार वाढणार आहे. वाढलेल्या आर्थिक भारामुळे व पालिकेच्या सर्व कारांमुळे शहरातील नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. सातारा शहरातील नागरिकांना आर्थिक संकटातून वाचवण्या साठी आर्थिक वर्ष (२०२०-२०२१) साठीच्या सर्व करसंकलनात २५ % ( तीन महिन्याच्या करात) सरसकट सूट देणे अत्यंत महत्वाचे आहे. सदर सूट पालिका क्षेत्रातील नागरिकांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने सर्व सातारकर नागरिकांचा विचार करून पालिका क्षेत्रातील सर्व करसंकलणात २५% सरसकट कर सवलत द्यावी अशी मागणी श्रीकांत (पप्पू) कांबळे यांनी केली आहे.

No comments