Header Ads

खा.उदयनराजे समर्थक महिला नेत्याच्या पेट्रोल पंपावर कारवाई; गीतांजली कदम यांच्यावर गुन्हा दाखल satara

सातारा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सातारा तालुक्यातील सातारा प्रांत मिनाज मुल्ला यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर गर्दी होऊ नये म्हणून पेट्रोल पंप चालकांना निर्बंध घातले आहेत. मात्र, सातारा तालुक्यातील आरळे येथील राधेय पेट्रोल पंपावर गर्दी असल्याची तक्रार नागरिकांनी केल्याने सातारा प्रांत कार्यलयाने कारवाई केली. पंप मालक गीतांजली संदीप कदम यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा पावणे नऊ वाजता सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गीतांजली कदम या खासदार उदयनराजे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि सातारा प्रांत मिनाज मुल्ला यांनी आढलेल्या आदेशानुसार कोरोनामुळे पेट्रोल पंपावर लोकांचीगर्दी होवु नये म्हणुन पेट्रोल पंपावर पेट्रोल देताना पेट्रोलपंप चालक यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत येणारे अधिकारी, कर्मचारी, कोरोना नियंत्रण व निर्मलन कार्य करणाऱ्या खाजगी व्यक्ती, अत्यावश्यक सेवा,वैद्यकीय उपचार व सहाय्याची गरज असणारी व्यक्ती यांना वगळून इतरांना पेट्रोल देणेवर बंधन घातले आहेत. तसेच या आदेशाचा भंग करणा-या पेट्रोलपंपावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार आरळे येथील पेट्रोल पंपावर गर्दी असल्याने तेथे तपासणी करून कारवाई करण्याची सूचना प्रांत मिनाज मुल्ला यांनी पथकास दिली.

त्यांच्या सूचनेनुसार सातारा पुरवठा निरीक्षक संतोष दळवी, मंडल अधिकारी सागर कारंडे, तलाठी गणेश भगत हे आरळे येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या राधेय पेट्रोलपंप येथे दि.25 रोजी दुपारी दीड वाजता पोहचले. तेथे बेकायदेशिर सरसकट लोकांना पेट्रोल व डिझेल विक्री असल्याचे नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार आढळून आले. त्यांनी पेट्रोलपंपाच्या मालकांबाबत चौकशी केली असता त्याचे मालक गितांजली संदिप कदम (रा आरळे) हे असल्याचे सांगितले. तसेच पेट्रोलपंपावरिल मॅनेजर यांचेकडुन पेट्रोल व डिझेल वितरणाच्या नोंदवही तपासणी केली.त्यात पेट्रोलपंपामधुन पेट्रोल व डिझेल विक्रीबाबत दि. 4 एप्रिल,दि.6 एप्रिल, दि. 24 एप्रिल आणि दि. 25 एप्रिल ह्या चार दिवसांचीच नोंद ठेवलेली आढळुन आली. पेट्रोलपंपामधुन जिल्हाधिकारी यांचा दि 23 मार्च 2020 रोजीचा पेट्रोल विक्री निर्बंधाबाबत आदेश लागु असताना देखील पेट्रोलपंपावर योग्य प्रकारे नोंदी न ठेवता पेट्रोल व डिझेल सर्वसामान्य नागरिकांना अनावश्यक नोंदी करुन उपलब्ध करुन दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल विक्री केलेबाबत पेट्रोल मालक गितांजली कदम (रा आरळे) यांच्या विरुद्ध सरकार तर्फे भा. द. वि.स. क 188, व आपत्ती व्यवस्थापण अधिनियम 2005 चे कलम 51 (ब)प्रमाणे गुन्हा दाखल रात्री पावणे नऊ वाजता झाला आहे. पुढील तपास सातारा तालुका पोलीस करत आहेत.

No comments