Header Ads

जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कराडमध्येही आज एक युवक कोरोना पॉझिटिव्ह satara

सातारा : सातारा शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. तसेच कराड तालुक्याचा आकडा 30 वर असताना सकाळी ग्रामीण भागातील एका मुलाचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. संबंधित मुलगा हा विलगिकरणातच होता. त्यामुळे आता साताऱ्यात कोरोना बाधितांची संख्या ४३ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात सदर महिला क्ष – किरण तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे व जिल्हा रुग्णालय परिसर म्हणजे सदर बझार येथील रहिवासी आहे. अहवाल पॉझेटिव्ह आल्यांनातर आरोग्य व पोलीस यंत्रणा गतिमान झाली आहे.

कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे दाखल असणाऱ्या तीन कोविड-19 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, स्व. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 33,कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 1 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 1 असे एकूण 61 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 14 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी  पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

No comments