Header Ads

जिल्हा युवा मोर्चाचे वतीने पत्रकार राजेघाटगे यांचेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध satara

कोरेगाव : बुध ता.खटाव येथील पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांचेवर झालेल्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे वतीने रमेश उबाळे यांनी निषेध करून यातील दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणीही पोलीस अधिक्षकांकडे त्यांनी केली आहे.


याबाबत दिलेल्या निवेदनात रमेश उबाळे यांनी म्हटले आहे, लॉकडाऊन कालावधीत अवैधरित्या विनापरवाना तळेगाव दाभाडे(पुणे )येथून बुध ता.खटाव  येथील एक कुटुंब आलेल्या कुटूंबियांची बातमी प्रसिद्ध करून आपली कर्तव्यनिष्ठा बजावली. दरम्यान संबंधीत दांपत्यावर पुसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचा राग मनात धरून पत्रकार प्रकाश राजेघाडगे यांना गंभिर मारहाण करून जखमी केले या घटनेचा आम्ही निषेध करतो. लोकशाहीचा आधारस्तभं असलेल्या वृत्तपत्र व त्या अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या पत्रकारावर गंभीररित्या हल्ला करणे अतिशय लांच्छनास्पद आहे. या निवेदनाद्वारे प्रकाश राजेघाटगे यांचेवर झालेल्या हल्ल्याचे आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करतो तसेच सर्व गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे. असेही रमेश उबाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर रमेश उबाळे यांची सही असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्याचे उबाळे म्हणाले.

No comments