Header Ads

भिवडी ग्रामस्थाना तीन महिन्यांचे रेशनिंग ताबडतोब द्या; रमेश उबाळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी satara

कोरेगाव : भिवडी ता.कोरेगाव येथील ग्रामस्थाना तीन महिन्याचे रेशन ताबडतोब देणेबाबत संबधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती भारतीय जनता पार्टी  युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिली.

याबाबत बोलताना रमेश उबाळे म्हणाले, भिवडी येथे संबधीत रेशनिंग दुकानदराच्या चुकीमुळे गेली  काही कुटुंबातील लोकांना  तीन महिने रेशन न मिळाल्याने ऐन कोरोनाच्या साथीमध्ये उपासमारीची वेळ आली आहे. येथील ग्रामस्थांनी माझ्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर आपण याबाबत कोरेगावच्या तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी संबधीत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत याचा अद्याप अहवाल मला मिळाला नाही परंतु  भिवंडी येथील रेशनकार्डधारक लोकांच्या  अंगठयाचे ठसे शासकीय कर्मचाऱ्यांनी  घेतले  आहेत.  तसेच केंद्रशासनाच्या २४ डिसेंबरच्या  अधिसूचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य मिळविण्यासाठी लाभार्थ्यांचे आधारकार्ड रेशनकार्डशी ऑनलाईन नोंदी करताना पुरवठा विभागात चुकीची माहिती भरल्याने  अनेक रेशनकार्डधारकाची  नोंदी योग्य रीतीने न केल्याचे  झाल्याचे समोर येत असून रेशन दुकानदाराने काही  काळ बेर केल्याची शक्यता व्यक्त केली जात असून   यामध्ये लाभार्थी असलेल्या  लोकांची चूक ती काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित रमेश उबाळे यांनी उपस्थित करून म्हणाले पुरवठा विभाग, रेशन दुकानदाराने केलेल्या चुकांची शिक्षा भोगण्याची वेळ या गोर गरीब कुटुंबियांवर आली आहे.

कोरेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदी दोषविरहित केल्या असत्या तर आज या शेकडो कुटुंबातील लोकांना धान्य वेळेवर मिळू शकले असते. शकडो प्राधान्य गटातील लाभार्त्याना बसला असून गेली तीन महिने रेशन दुकानातुन धान्य न मिळाल्याने भिवडी येथील रेशनचे लाभार्थी चिंतेत आहेत.आम्ही खायचे काय असा प्रश्न त्यांचेपुढे असून म्हणून वंचित असलेल्या लाभार्त्याचे सर्व्हेक्षण करून त्यांना एकाचवेळी तीन महिन्याचे रेशन देण्यात यावे अशी आमची मागणी असून जिल्हाधीकारी या प्रकरणात लक्ष घालून आपणास तीन महिन्याचे रेशन देतील असा आपणास  विश्वास वाटतो. असेही उबाळे यांनी नमूद केले.

भिवडीच्या लोकांनी घाबरून जाऊ नये विधनसभेच्या निवडणूकीत तुम्ही  भारतीय जनता पार्टी बरोबर राहीलात परतु ही वेळ आता राजकारण करण्याची नाही तुमचे माझ्यावर ऋण आहेत. मी सध्या लॉकडाऊन असल्याने पुण्यात अडकलो आहे. तरीही मी तुमच्या पाठीशी आहे घाबरून जाऊ नका. तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असेही रमेश उबाळे यावेळी म्हणाले.

No comments