Header Ads

कराड येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह तर 44 रिपोर्ट निगेटिव्ह; 72 जणांना केले दाखल satara

सातारा : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल असणाऱ्या एका 10 वर्षीय मुलाचा अहवाल कोविड-19   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

आता सातारा जिल्ह्यात 34  कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 44  कोविड-19 बाधित  रुग्ण आढळले आहेत.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12 असे एकूण 44 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

आज दि.30 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 10, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 47, ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 1 व कोरेगाव येथे 14 असे एकूण 72 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या  एका कोविड बाधित रुगणाचा 14 दिवसानंतर दुसरा नमुना असे एकूण 73 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

1 comment: