Header Ads

जिल्ह्याचा वार्षिक पत आराखडा 2020-2021 चा लोकार्पण सोहळा; सातारा जिल्ह्यातील बँकानी उद्दीष्ठपुर्तीची परंपरा कायम ठेवावी : ना. बाळासाहेब पाटील satara

सातारा : सातारा जिल्ह्याचा 2020-2021 या आर्थिक वर्षाचा 8500 कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखड्याचे  लोकार्पण आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकांनी नविन पत आरखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  सुरवातीपासूनच प्रयत्न करण्यात यावे असे सांगीतले. जिल्ह्यातील शेतक-यांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा प्राधान्याने करावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी  केले. सातारा जिल्ह्याचा 2020-2021 या आर्थिक वर्षाचा 8500 कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखड्याचे  लोकार्पण आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ,  जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, महाराष्ट्र बँकेचे आंचल प्रबंधक वसंत गागरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर उपस्थित होते.

नविन पत आरखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व बैंकानी सुरवातीपासूनच प्रयत्न करण्यात यावे असे सांगीतले. जिल्ह्यातील शेतक-यांना जास्तीत जास्त कर्जपुरवटा प्राधान्याने करावा. आगामी काळात कृषि व औद्योगिक विकासात सातारा जिल्ह्याचे स्थान महत्वाचे राहणार असल्याचे बँकांनी शेती व लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करावा असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

No comments