Header Ads

परराज्यात अडकलेल्या मजूरांची माहिती 1077 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह satara

सातारा : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलेला असून यामुळे जिल्ह्यातील कायमस्वरुपी स्थायीक असणारे परंतु कामानिमित्त, नोकरीनिमित्त परराज्यांमध्ये अडकून असलेल्या मजूरांची माहिती 1077 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. जिल्ह्यातील जे मजूर परराज्यांमध्ये अडकलेले आहेत, अशा मजूरांबाबतची सविस्तर माहिती परराज्यात अडकेलेल्या मजूराचे नाव, मोबाईल क्रमांक, सध्या ज्या राज्यात राहत आहे तेथील संपूर्ण पत्ता, व्यवसाय याची माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

No comments