Header Ads

राज्यस्तरीय सब जुनियर हॉकी स्पर्धेत साताराच्या मुले व मुलींच्या संघाला कांस्य पदक satara

सातारा : हॉकी महाराष्ट्र आयोजित मेजर ध्यानचंद पोलीग्रास हॉकी स्टेडीअम  पुणे मधे राज्यस्तरीय सब ज्युनियर मुलींच्या हॉकी स्पर्धा दि.7 फेब्रूवारी ते 9 फेब्रुवरी रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा संघात के. एस. डी. शानभाग विद्यालयाचे 9 खेळाडू सहभागी होते. यामध्ये संघाच्या कर्णधारपदी शानभाग विद्यालयाच्या गत दोन वर्षाच्या शालेय 63 व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये कांस्य पदक विजेती श्रुतिका राजेंद्र नलवड़े ही होती.

सातारा जिल्ह्याच्या संघाने राज्य स्पर्धेत श्रुतिकाच्या नेतृत्वाखाली कांस्य पदक पटकावले.  संघाने राज्य सब ज्युनियर स्पर्धे मधे कास्य पदकासाठी सोलापूर  संघाबरोबर सामना होता. सातारा संघाने सोलापूर संघाला 1-0 अश्या गोल फरकाने पराभूत करत कास्य पदक पटकावले. या स्पर्धेत सामनावीर म्हणून राष्ट्रीय पदक विजेती व संघाची कर्णधार श्रुतिका राजेंद्र नलवड़े हीचा गौरव करण्यात आला.  या संघाला हॉकी प्रशिक्षक सागर चंद्रकांत कारंडे, संघ व्यवस्थापक रूपेशकुमार त्रिम्बके होते.या स्पर्धेत शानभाग विद्यालयतील 9 खेळाडूंचा सहभाग होता. यामध्ये  श्रुतिका नलावड़े (संघ-कर्णधार), वर्षा शेंडगे (गोलकीपर), वैष्णवी चव्हाण, अवंति आवले, साक्षी चौंधरी, साक्षी शिंदे, निकिता देशमुख, सृष्टी देशमुख, श्रद्धा मगर या सहभागी होत्या. दरम्यान, राज्यस्तरीय सब जुनियर हॉकी स्पर्धेमध्येही मुलांच्या सातारा संघाला कांस्य पदक मिळाले. ही स्पर्धा दि. 3 फेब्रुवारी ते 6  फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा संघात के.एस.डी. शानभाग विद्यालयाचे 10 खेळाडू होते. यामध्ये संघाचे कर्णधारपद रितेश महेश जाधव यांच्याकडे देण्यात आले.रितेश जाधव याच्या नेतृत्वा खाली संघाने राज्य सब ज्युनियर स्पर्धे मध्ये कास्य पदकासाठी कोल्हापूर संघाबरोबर सामना होता. सातारा संघाने कोल्हापुर संघाला 3-2 अश्या गोल फरकाने हरवले व कास्य पदक पटकावले. या स्पर्धेत सामना वीर म्हणून विश्वजीत सतीश जाधव याला गौरविण्यात आले. या संघाला हॉकी प्रशिक्षक सागर चंद्रकांत कारंडे, संघ व्यवस्थापक अनिकेत अडागळे होते. या स्पर्धेत शानभाग विद्यालयतील 10 खेळाडूंचा समावेश होता. यामध्ये  रितेश जाधव(सातारा संघ-कर्णधार), विश्वजीत जाधव, स्वराज वेंदे, प्रथमेश देशमुख, सिद्धांत घाटगे, आतिश घाटगे, रितेश माने, ओम शिंदे, मानस माने, शिवधन खंदारे सहभागी होते. या स्पृहणीय यशाबद्दल शानभाग विद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रिडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्‍वस्त अ‍ॅड.विलास आंबेकर, सौ.उषा शानभाग, दिपक पाटील, संचालिका सौ.आचल घोरपडे, मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, पालक संघाचे प्रतिनधी तसेच शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून दोन्ही संघाना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments