Header Ads

एनआरसी विरोधात साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन सुरुच ; अनेकांचा पाठिंबा satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील सीएए, एनपीआर, एनआरसी विरोधी कृती समितीतर्फे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असुन, दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनात अनेक जण सहभागी झाले होते. अनेक मान्यवरांनी धरणे आंदोलनस्थळी येवून पाठिंबा जाहीर केला. एनआरसीविरोधी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. या धरणे आंदोलनात लेक लाडकी अभियान, नवयान महाजलसा, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, मुक्तीवादी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, जमियात उलेमा ए हिंद, मुस्लिम जागृती अभियान अशा विविध संघटना सहभागी झाल्या आहेत.

केंद्र सरकारच्या नागरिकता विषयक सुधारणा विधेयकाला तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणीला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. साताऱ्यातील महिलांनीही आता पुढाकार घेतला आहे. या आंदोलनाला भेट देवून पाठिंबा जाहीर करणाऱ्यामध्ये मानवी हक्क चळवळीतले कार्यकर्ते प्रदिप मोरे, शैला जाधव, प्रा. भास्कर कदम, प्रा. हिंदुराव पवार, शाहीर प्रकाश फरांदे, अमोल बनसोडे, हाजी जमीर मुल्ला, प्रकाश कांबळे, प्रकाश सावंत आदिंचा समावेश आहे. हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अनेकजण झटत आहेत. यावेळी एनआरसी हटाव देश बचाव, हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई हम सब भाई भाई.... आम्ही भारतीय, आम्ही भारतीय....अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

No comments