Header Ads

गरजूंना मदतीचा हात देवून मा.खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा satara

सातारा : मा.खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी माझा वाढदिवस साजरा न कराता सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांची सेवा करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सुनील तात्या काटकर, मा.जि.प. सदस्य संदीपभाऊ शिंदे व युवानेते संग्राम बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू बर्गे-पाटील मित्र समूहाच्या वतीने गोर-गरीब विद्यार्थ्यांना कपडे वाटप करून मा.खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नेहमीच सामाजिक कार्यात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अग्रेसर असणारे चिंचणेर वंदन गावचे सुपुत्र राजू बर्गे-पाटील यांनी उदयनराजेंच्या वाढदिनी अनाथ व गरजू मुलांना गणवेश, रंगीबेरंगी कपडे व शालेय साहित्याचे वाटप करून उदयनराजेंना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. राजू बर्गे-पाटील यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कारंडवाडी येथे सुनील तात्या काटकर, मा.जि.प.सदस्य संदीपभाऊ शिंदे, युवानेते संग्राम बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून गरजू मुलांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्या अर्चनाताई देशमुख, अनिताताई चोरगे, गितांजलीताई कदम, रेखाताई शिंदे, प्रवीण धस्के, आर.वाय.जाधव, अंकुश जाधव, संतोष घाडगे, अमोल तांगडे, बाळासाहेब चोरगे, बाळासाहेब ननावरे, विकास पवार, सचिन नलावडे, मनोज सोलंखी, शरद जाधव, सुनील बर्गे, प्रशांत निंबाळकर, विनय माने, राहुल पाटोळे, कौस्तुभ मोरे, युवराज सावंत तसेच उदयनराजेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments