Header Ads

"आमची छाती रं फौलादी, आम्ही शिवबाच्या औलादी"चा सातारच्या धरणे आंदोलनस्थळी घुमला आवाज satara

सातारा : रयतेचा राजा शिवाजी "आमची छाती रं फौलादी, आम्ही शिवबाच्या औलादी" अशी शाहिरी कवनं गात शाहिरांनी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या सीएए, एनपीआर,  एनआरसी विरोधी आंदोलनस्थळी मोठ्या उत्साहात साजरी केली. सीएए, एनपीआर, एनआरसी विरोधी कृती, सातारा यांच्या वतीने सातारा येथे मुस्लिम समाजातील भगिनींनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज तेरावा दिवस होता.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आंदोलन स्थळी छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवचरित्राचे अभ्यासक विलासराव सोनावणे व उपस्थितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. यावेळी हाजी मुफ्ती , हाजी ईक्बाल शेख, हाजी सादिकभाई शेख, प्रा. दत्ताजीराव जाधव, जमीर शेख, मुजफ्फर सय्यद, जनार्दन घाडगे व महिला उपस्थित होत्या.

शाहीर सचीन माळी, शाहीर शीतल साठे, अनिकेत मोहिते व नवयान महाजलशाचे कलाकारांनी शाहिरीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे कार्य उलगडून दाखवले. धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज याविषयावर बोलताना शिवव्याख्याते विलासराव सोनावणे यांनी शिवकाळातील अनेक दाखले दिले. यावेळी सहभागी अनेक महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली.

No comments