Header Ads

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये उमाजी नाईकांची जयंती साजरी करा : रमेश उबाळे satara

कोरेगाव : इतिहासातील शूर व लढवय्या असे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणाऱ्या या अज्ञात युगात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक हरवत आहेत  म्हणून उमाजी नाईकांची  जयंती सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये साजरी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हासरचीटणीस रमेश उबाळे यांनी जिल्ह्याशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद(प्राथमिक विभाग) यांचेकडे केली निवेदनाद्वारे केली आहे.

रमेश उबाळे म्हणाले, सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या क्रांतीचे स्वप्न पाहणारा निधड्या छातीचा आद्यक्रांतिवीर नरवीर म्हणून  उमाजी नाईकांची इतिहासात ओळख आहे. १८५७ चा उठाव होण्यापूर्वी उमजींनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड करून पेटून उठणारा क्रांतीवीर उमाजी नाईक होते त्यांनी इंग्रज सरकारला  सळो की पळो करून सोडत   इंग्रजांच्या मनामध्ये प्रचंड अशी दहशत निर्माण केली होती. उमजींपुढे छ.शिवाजी महाराजांचा आदर्श होता. त्यांच्या मार्गानेच ते स्वातंत्र्याचा लढा लढत होते. दुसरा शिवाजी निर्माण होऊ नये म्हणून कुटनीती वापरून इंग्रजांनी त्यांना फाशी दिल्याचे बोलले जाते. सर्व शाळा, शासकीय कर्यालयमध्ये महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात परंतु उमाजी नाईकांची जयंती का साजरी केली जात नाही असा सवाल करून रमेश उबाळे म्हणाले,   इतिहास विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती जिल्ह्यातील नव्हे  तर राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरी करण्यात  यावी अशी आमची मागणी आहे. उमाजी नाईकांची जयंती केवळ रामोशी समाज साजरा करतो आहे. परंतु उमाजी नाईकांचे व्यक्तिमत्त्व केवळ एका समजापुरते मर्यादित नाही तर सर्वसमावेशक होते.

आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती सर्व शाळांमध्ये साजरी करण्याचा शासकीय आदेश असताना ती साजरी का केली जात नाही असा सवाल उपस्थित करून रमेश उबाळे म्हणाले, उमजींचा आदर्श सर्वांनीच घेऊन आजचा समाज घडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असेही उबाळे यावेळी म्हणाले. याबाबत निवेदन देताना शिक्षणाधिकारी याबाबत आदेश काढून पुढीलवर्षांपासून सर्व शाळांमध्ये उमाजी नाईकांची जयंती साजरी करणेसंदर्भात चर्चा केल्यानंतर त्यांनी याबाबत सर्वच शाळांना आदेश करण्याचे आश्वासन यावेळी रमेश उबाळे यांना दिले.

No comments