Header Ads

वरिष्ठ छायाचित्रकाराला मारहाण महागात पडले; पोलिस निरिक्षकांना केले निलंबित satara

सातारा : "मिड डे" चे वरिष्ठ छायाचित्रकार आशीष राजे यांच्यावर गुरूवार  दिनांक ६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आज गृहमंत्री अनिल  देशमुख यांच्या सोबत झालेल्या पत्रकार संघटनांच्या बैठकीत राजे मारहाण  प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी बोरसे (एपीआय) यांची चौकशी होईपर्यंत निलंबित तर दुसरे पोलिस अधिकारी शेख (पीएसआय) यांचा प्रोबेशन कार्यकाळ वाढविला जाईल असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सहपोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते.

राजकीय मोर्चे, आंदोलने किंवा कोणत्याही दुर्घटनेप्रसंगी पोलिसांनी पत्रकारांशी सौजन्याने वागावे असे परिपत्रक पोलीस आयुक्तांनी काढले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व अधिक्षकांनी करावी अशा सुचना त्वरित दिल्या जातील. तसेच साकीनाका आग प्रकरणी वाहतूक विभागाच्या एसीपी अस्मिता भोसले व बांद्रा मातोश्री येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केल्याप्रकरणी खेरवाड़ी पोलिसांना योग्य ती समज दिली जाईल असाही निर्णय घेतला गेला. टीव्ही जर्नालिस्ट एसोसिएशन, मराठी पत्रकार परिषद, बॉम्बे फोटोग्राफर असोसिएशन, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ या पत्रकार संघटनानी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची  मागणी लावून धरली ती गृहमंत्र्यांनी  मान्य केली.

No comments