Header Ads

कोरेगाव मतदारसंघ होणार प्रदूषणमुक्त satara

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदार संघात माझ्या आभार दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी फटाके वाजवू नयेत. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमणात प्रदूषण निर्माण होते. परिणामी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रदूषणमुक्त करण्याचे आवाहन आ.महेश शिंदे यांनी केले असल्याची माहिती रमेश उबाळे यांनी दिली. आ.महेश शिंदे युवा मंचची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी रमेश उबाळे, राहुल बर्गे, श्रीकांत बर्गे, किरण काटकर आदी उपस्थित होते.

फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. तसेच दूषित हवा निर्माण होत असल्याने याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असतो. तसेच फटाके वाजूवन झाल्यानंतर रस्त्यावर प्रचंड कचरा होतो. या कचऱ्यापासूनही लोकांच्या आरोग्याला हानी पोहचू शकते. एकूणच फटाके वाजविल्यानेच स्वागत होते असे काही नाही. फटाके म्हणजे कार्यकर्त्यांना भुर्दंड आहे. असे म्हणाल्यास वावगे ठरु नये. एखाद्या कार्यकर्त्याला वाटले तर त्याने फटाक्याच्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी. परंतु माझ्या अभारदौऱ्यात फटाके वाजवू नयेत असेही आ.महेश शिंदे यांनी नमूद केल्याचे रमेश उबाळे यांनी सांगितले.

कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये अनेक गरजू विद्यार्थी आहेत. त्यांना वह्या, पुस्तक आदी शालेय साहित्य मिळत नसल्याने एखाद्या विद्यार्थ्यावर शाळा सोडून देण्याचीही वेळ येत असते. माझ्यावर प्रेम असलेल्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या सुख-दुखामध्ये सहभागी होऊन त्यांना आधार दिला तर अशा कार्यकर्त्यांचा सत्कार मी करेन असेही आ. शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान आ.महेश शिंदे यांचा उद्या मंगळवारी तांदुळवाडी, मंगळापूर, शिरढोण येथे नियोजित दौरा असून येथील कार्यकर्त्यांनी आ.शिंदे यांनी केलेल्या आवाहनाची दखल घ्यावी असेही उबाळे यावेळी म्हणाले.

आ.महेश शिंदे विचार मंचने घेतली शपथ....

आम्ही फटाके वाजवून प्रदूषण निर्माण करणार नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रदूषणमुक्त कोरेगाव विधानसभा मतदारसंघ करू अशी शपथ आ.महेश शिंदे मंचच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घेतल्याचेही रमेश उबाळे यांनी सांगितले.

No comments