Header Ads

रक्तदान करून उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा; नगरसेवक प्रशांत आहेरराव मित्र समुहाचा उपक्रम satara

सातारा : ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांच्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने उदयनराजेंच्या वाढदिनी श्री.शाहू मंडळ, आदर्श चॅरिटेबल ट्रस्ट व नगरसेवक प्रशांत आहेरराव मित्र समूहाच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबीर आयोजित करून उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मा.खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी माझा वाढदिवस साजरा न कराता सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांची सेवा करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगरसेवक प्रशांत आहेरराव म्हणाले, रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे रक्तदात्यांनी अधिकाअधिक रक्तदान करणे गरजेचे आहे. शिबिरात जवळपास ७५ च्या वर रक्तदात्यांनी  रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उपनगराध्यक्ष किशोर तात्या शिंदे, सभापती यशोधन नारकर, डनीयल फरांदे, सागर राजेमहाडीक, सामाजिक कार्यकर्ते भाऊ जगदाळे, बंडू सूर्यवंशी, अजित गुजर, नासीर शेख, सुरेश राजेशिर्के, नंदकुमार महाडिक यांनी भेट दिली. रक्तदान शिबिरासाठी भूषण खानविलकर, प्रवीण मोने, पप्पू मंडावले, आशुतोष निगडे, संतोष लांडगे, शैलेश गुजर, प्रसाद पवार, ज्ञानेश्वर कोळी, नितीन पवार, विक्रम आहेरराव, पृथ्वीराज आहेरराव, अंजू सोनावणे, सुरेंद्र जाणकर यांनी परिश्रम घेतले.

No comments