Header Ads

मतीमंद महिलेवर बलात्कार करणारा अटकेत; बोरगाव पोलीस निर्भया पथकाची कारवाई satara

सातारा : अपशिंगे (मिलीटरी) ता.जि.सातारा येथील ३० वर्षीय मतीमंद महिलेवर अज्ञाताने बलात्कार केल्याने व त्यामध्ये ती गरोदर राहिल्याने तीचे नातेवाईकांनी तीला सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे उपचारार्थ दाखल केले होते. त्याबाबत बोरगाव पोलीस ठाणेला कळविणेत आले होते. बोरगाव पोलीसांनी त्याची गांभार्याने दखल घेत सदरच्या महिलेचा मामा यांचे तक्रारीवरुन बोरगाव पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) (द) प्रमाणे कालरोजी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासामध्ये सदर पिडीत महिलेकडे चौकशी केली असता सदर महिलेवर गावातील काहीजणानी तीच्या अवस्थेचा फायदा घेवून वेळोवेळी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले होते. पंरतु सदरची महिला ही मतीमंद असल्याने तीला आरोपी कोण आहेत याबाबत माहिती नव्हती. तीला तेवढी समज नव्हती. तीचे नातेवाईकांकडे चौकशी केली पंरतु त्यांनाही बलात्कारी कोण आहेत याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. मात्र प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि चंद्रकांत माळी, तसेच सातारा महिला विशेष तपास पथकाच्या व निर्भया पथकाच्या प्रभारी अधिकारी सपोनि माधुरी जाधव यांना तपासाबाबत सुचना देवुन अज्ञात आरोपींचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते. चंद्रकांत माळी व माधुरी जाधव यांनी तपासाची रुपरेखा ठरविली.

खुप कमी माहिती असताना देखील तपास पथकाने आटोकाट प्रयत्न करुन आरोपींचा शोध घेवुन एका आरोपीस जेरबंद केले. सदरचे आरोपीने गुन्हा केलेचे कबुली देवुन त्याचे सोबत आणखी एका आरोपीबाबत माहिती दिली. त्यावरुन तपास पथकाने तात्काळ दुसरा संशयीत आरोपीस देखील ताब्यात घेतले असुन तो अल्पवयीन असल्याची माहिती समोर आई आहे. हि कारवाई बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि चंद्रकांत माळी, तसेच सातारा महिला विशेष तपास पथकाच्या व निर्भया पथकाच्या प्रभारी अधिकारी सपोनि माधुरी जाधव, तसेच सातारा शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे पोलीस उप निरीक्षक नानासाहेब कदम म.पो.कॉ.रेश्मा सोनावले, म.पो.काँ.अर्चना मोटे, पो.काँ.सुशिलकुमार मांढरे, पो.काँ.उमेश बगाडे, बोरगाव पोलीस ठाणेचे स.पो.उप.नि.कुंभार, स.पो.उप.नि.यादव, स.पो.उप.नि.पायमल, पो.हे.काँ. बाबा महाडीक, पो.काँ.चेतन बगाडे, पो.काँ.विशाल जाधव, पो.ना.राजु शिखरे,चालक पो.कॉ.प्रविण माने तसेच सातारा शहर, शाहुपुरी, सातारा तालुका पोलीस स्टेशन डीबीचे सर्व कर्मचारी यांनी केली. 

No comments