Header Ads

जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचे १२ व १३ मार्च रोजी आयोजन; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न satara

सातारा : जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव १२ व १३ मार्च २०२० रोजी आयोजित करण्यात यावा तसेच यासाठी अभिनव संकल्पनांचा वापर करून पुस्तकांची आवड जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत रुजविण्यासाठी याचा उपयोग व्हावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ग्रंथोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेताना ते बोलत होते. आढावा बैठकीस या समितीचे सदस्य जिल्हा शिक्षण अधिकारी राजेश क्षीरसागर, जिल्हा ग्रंथपाल संघाचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत नलावडे,  जिल्हा माहिती अधिकारी युवराज  पाटील, ग्रंथालय संघाच्या नंदा जाधव, सदस्य, सचिव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनावणे उपस्थित होते.

No comments