Header Ads

एनआरसी मुळे आसामी संस्कृती ओळख पुसण्याचे षडयंत्र : प्रदिप मोरे satara

सातारा : एनआरसीच्या माध्यमातून आसाम राज्याच्या संस्कृतीची ओळख पुसण्याचे केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे. हे षडयंत्र ओळखल्यानेच आसामी जनतेचाच नव्हे तर ईशान्य-पुर्वेकडील सातही राज्यांचा एनआरसीला विरोध असल्याचे तेथील नागरिकांशी बोलल्यानंतर जाणवले असल्याचे दलित फौंडेशनचे उपाध्यक्ष प्रदिप मोरे यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलताना सांगितले. एनपीआर, एनआरसी, सीएए विरोधी कृती समिती सातारच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या आठराव्या दिवशी दलित फाउंडेशनचे उपाध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त प्रदीप मोरे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नुकतेच ते आसाममध्ये जाऊन आलेले आहेत. आसाम हा त्यांच्या कार्यक्षेत्राचा भाग असल्याने आसाममधील एनआरसीचा स्थानिक लोकांवर झालेला परिणाम त्यांनी जवळून पाहिलेला आहे. त्याच बरोबर आजची तिथली परिस्थिती काय आहे ? यावर ते बोलले.

आसाममध्ये फक्त आसामीच नाही तर बंगाल, भुतान, मणिपूर येथील नागरिक स्थायिक झाले आहेत. आसु संघटनेबरोबर केंद्र सरकारने १९७१ साली एक करार करण्यात आला होता. त्यानुसार नागरिकत्वचा मुद्दा शांततेत सोडवण्यात आला होता आणि भाजपने २०१४ नंतर नागरिकत्वाच्या मुद्यावर वाद सुरू केला असेही प्रदिप मोरे म्हणाले. दरम्यान दलित फाउंडेशनने "संविधानाचे घर" ही एक अनोखी संकल्पना मांडली आहे. त्यामधून  संविधानामुळे नागरिकांना  मिळणारे  हक्क यावेळी प्रदिप मोरे यांनी समजावून सांगितले. यावेळी सलमा कुलकर्णी-मोरे, जमीर शेख, मुजफ्फर सय्यद, जयंत उथळे, मिनाज सय्यद, हाजी मुफ्ती आदी उपस्थित होते.

No comments