Header Ads

नवदांपत्य विवाह नोंदणी करुन थेट धरणे आंदोलनात सहभागी; सातारच्या एनआरसी विरोधी आंदोलनात अभिनव प्रकार satara

सातारा : साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एनआरसी, सीएए, एनपीआरच्या विरोधात मुस्लिम भगिनींनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज दुपारी तिथे विवाह नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणी करुन नवदांपत्य आले आणि त्यांनी एनआरसी विरोधी आंदोलनास भेट देवुन पाठिंबा दर्शक भाषणही केले. थोडावेळ आंदोलन स्थळी बसले सुध्दा.नवदांपत्य आंदोलन स्थळी आले व त्यांनी आंदोलनात सहभागी होवून पाठिंबा जाहीर केला याचीच दिवसभर चर्चा होत होती.

जावली तालुक्यातील कुसुंबी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गाडे यांची कन्या पायल गाडे आणि जावली तालुक्यातील कुडाळ येथील राजेंद्र जगताप यांचे सुपुत्र विक्की यांचा आज नोंदणी पध्दतीने विवाह झाल्यानंतर थेट ते  नवदांपत्य सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आठव्या दिवशीही सुरू असलेल्या एनआरसी विरोधी धरणे आंदोलन स्थळी आले. आंदोलन स्थळी बसले. नंतर पायल गाडे यांनी भारतीय राज्य घटनेची मोडतोड करण्याचे काम सध्याचे केंद्र सरकार करत आहे. हे आम्ही सहन करणार नाही. म्हणुनच या आंदोलनाला पाठिंबा आहे असे सांगितले. यावेळी नववधूचे वडील संजय गाडे व आई शालन गाडे, वराचे वडील राजेंद्र व आई सुरेखा, राजेंद्र गलांडे, मिनाज सय्यद, जमीर शेख, अहमद कागदी, अमजदभाई शेख, जयंत उथळे आदि उपस्थित होते.

या आंदोलन स्थळी खूप वेगवेगळ्या विचारांचे, संघटनांचे, जातीधर्माचे लोक येत आहेत. प्रत्येकाच्या भावना आणि विचार तीव्र स्वरूपाचे आहेत. भाषण, कविता, शाहिरी, शेरोशायरी, समूह गान अशा विविध मार्गांनी ते व्यक्त होत आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा राग, टीका, उपहास व्यक्त होतो. हे योग्यच आहे. परंतु हे होत असताना व्यक्तीचा द्वेष किंवा तिरस्कार होणार नाही हे लक्षात घेतले जात आहे हे याठिकाणी अधोरेखित करावे लागेल.

No comments