Header Ads

चीनमधील साताऱ्याच्या अश्विनी पाटील अडकल्या; मायदेशी परत येण्यासाठी भारत सरकारला विनंती satara

सातारा : सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने ८५० हून अधिक चिनी नागरिकांचा बळी घेतला आहे. चीनमध्ये २५००० हून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील अश्विनी अविनाश पाटील या चीनमधील वुहान शहरात अडकल्या आहेत. त्यांनी मायदेशी परत येण्यासाठी भारत सरकारला विनंती केली आहे. त्यांचा पासपोर्ट चीनच्या सरकारी यंत्रणेमध्ये अडकल्यामुळे त्यांना मायदेशी परत येण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भारत सरकारला आपल्या चीनमधल्या राहत्या घरातूनच मायदेशी परत घेऊन जाण्यासाठी पुकार दिला आहे.

चीनमध्ये ज्या ठिकाणी साताऱ्याच्या अश्विनी पाटील राहत आहेत. त्याठिकाणी दैनंदिन जीवन व जीव मुठीत धरून कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या राहतात, या प्रतिक्रियाही त्यांनी व्हिडिओमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे आता भारत सरकार त्यांच्या या आव्हानाला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अश्विनी पाटील या सध्या चीनमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांकडून सुद्धा सातत्याने अश्विनी पाटील यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुर्दैवाने त्यांच्याबरोबर त्यांचे पतीही कामानिमित्त दुसऱ्या देशात गेल्याने आज महिन्यापूर्वी गेलेल्या अश्विनी पाटील या आता भारतात परतण्यासाठी सरकारकडे विनंती करत आहेत.

No comments