Header Ads

आ. सदाभाऊ खोत यांच्या राज्यव्यापी दौऱ्यास पुणे जिल्ह्यातुन सुरुवात; २४ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन satara

सातारा : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेब यांनी महाराष्ट्राचा झंजावाती दौरा सुरू केला असुन, या दौऱ्याची सुरवात पुणे जिल्ह्यातून केली आहे. पुणे जिल्हातील दौंड तालुक्यातील पारगांव येथे दिनांक ७/२/२०२० रोजी भव्य शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सदाभाऊंनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली.

येत्या २४ फेब्रुवारीला राज्यभर रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालयासमोर संपर्ण कर्जमाफी, गायच्या दुधाला चाळीस रुपये व म्हशीच्या दुधाला साठ रुपये तसेच शेतीसाठी दिवसा लाईट या महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्या प्रमाने राज्य शासन कार्यवाही करत नसल्याने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा करण्यात आली. या मेळाव्यास रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष दिपक भोसले, महिला प्रदेशाध्यक्षा सीमाताई पवार, राज्यप्रवक्ते भानुदास शिंदे, गजानन गांडेकर, महीला प्रदेश उपाध्यक्षा नीताताई खोत, मराठवाडा विभाग प्रमुख मीनाताई गायके तसेच पुणे जिल्हातील सर्व आजी माजी पदाधिकारी व जिल्हातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक दौंड तालुका अध्यक्ष सर्फराज शेख व महीला आघाडीच्या तालुकाअध्यक्षा आनिताताई ताकवणे यांनी केले.

No comments