Header Ads

गटविकास अधिकाऱ्यांची ग्रामसेवकावरील कारवाई संशयास्पद satara

कोरेगाव : संविधानदिन साजरा न करणाऱ्या त्रिपुटी ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवकावर सुमारे दोन वर्षानंतर फक्त सक्तताकीद देऊन ग्रामसेवकाला मुक्त करणाऱ्या कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी साहेबांची ही कारवाई संशयस्पद असून, दोन वर्षानी हि कारवाई करणारे गटविकास अधिकारी अतिकार्यक्षम असून त्यांचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तेच झाला पाहिजे असे आम्हाला आता वाटू लागल्याचे मत भारतीय जनता पार्टी जिल्ह्या युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी व्यक्त केले आहे.

रमेश उबाळे म्हणाले, संविधान सर्वोच्च आहे. संवीधानावर आज संपूर्ण देशाचा कारभार सुरू आहे. संविधानदिन साजरा केलाच  पाहिजे म्हणून शासन निर्णय झाला आहे. दि.२६.११.२०१८ रोजी संबधित त्रिपुटी ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये संविधानदिन साजरा केला नाही म्हणून आम्ही सदर बाब कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच संबधित ग्रामसेवकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई पाहता त्यांना संविधान, घटना म्हणजे काय आहे ? हेच समजले नसल्याचे दिसते. संविधान म्हणजे काय ? हे त्यांना समजले असते तर त्यांनी संविधानदिन साजरा न करणाऱ्या ग्रामसेवकाला फक्त ताकीद देऊन सोडले नसते. असे आमचे मत आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई पाहता भविष्यात इतर ग्रामसेवक, शासकीय कर्मचाऱ्यांना संविधान तसेच संविधानदिनाचे महत्व राहणार नाही. भविष्यातही असे प्रकार इतर ग्रामसेवकांकडून होणार आहेत. मग प्रत्येकवेळी तुम्ही ताकीदच देऊन सोडणार आहे का ? असा सवालही रमेश उबाळे यांनी यावेळी उपस्थित केला.

संबधित ग्रामसेवकाला "सक्तताकीद" देणे म्हणजे फक्त समजूत काढल्याचा हा प्रकार असून प्रशासनातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी वागले तर सामान्य जनतेने कुठे न्याय मागायचा ? मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हापातळीवरील एक जबाबदार कार्यकर्ता आहे. संबधित ग्रामसेवकाला फाशीवर लटकवा अथवा त्यांना निलंबित करून त्यांचे कुटूंब वाऱ्यावर सोडा अशीही आमची मागणी नाही. परंतु देशाच्या संविधानाचा अपमान कुणी करू नये अशी आमची मागणी आहे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संविधांदिन साजरा करा असा शासन निर्णय झाला आहे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायत प्रशासनातील प्रमुख आहे. आणि तोच जर ग्रामपंचायतीमध्ये संविधानदिन साजरा करत नाही ही त्यांची चूक नाही का ? याची सविस्तरपणे चौकशी करून गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकावर कडक कारवाई करणे हे त्यांचे कर्तव्य नाही का ? असे सांगून रमेश उबाळे पुढे म्हणाले, दि.२६.११.३०१८ रोजी आम्ही त्रिपुटी ग्रामपंचायतीमध्ये संवीधानदिन साजरा केले नसल्याचे निवेदनाद्वारे कळविले होते. खरे तर या घटनेची तातडीने चौकशी करून ग्रामसेवकावर कारवाई होणे अपेक्षित होते परंतु सुमारे दोन  वर्षे  ही चौकशी सुरू आहे. मला दोन  वर्षानंतर "सक्त ताकीद" केल्याची कारवाई केल्याचे पत्र मिळत असेल तर पंचायत समिती, जिल्हा परिषदिला संविधान दिनाचे किती महत्व आहे हे यावरून समजते. मुळात गटविकास अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई संशयस्पद असून या कारवाईची चौकशी व्हावी अशी आमची  मागणी राहणार असून ग्रामसेवकावर केलेली कारवाई पाहता गटविकास अधिकारी अतीकार्यक्षम असल्याचे दिसत असून त्यांचा सत्कार आता जिल्हाधिकाऱ्यांनीच केला पाहिजे असेही रमेश उबाळे शेवटी म्हणाले.

No comments