Header Ads

फलटण येथील कंमिन्स कंपनी आवारातील ३७.५०० ब्रास डबर व मरुम साठयाचा २४ फेब्रुवारी रोजी जाहीर लिलाव satara

सातारा : मौजे सुरवडी ता. फलटण  येथील. औद्योगिक वसाहतीतील कमिन्स इंडिया लि. कंपनीच्या आवारातील 15,000  ब्रास  500 ब्रास माती मिश्रीत मुरुम अशा एकूण 37,500 ब्रास गौणखनिज साठयाचा जाहिर लिलाव उपविभागीय अधिकारी, फलटण उपविभाग, फलटण यांचे कार्यालयात सोमवार दि. 24 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता लिलाव उपविभागीय अधिकारी, फलटण यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. हा गौणखनिज मौजे सुरवडी ता. फलटण येथील औदयोगित वसाहतीत मे. कमिन्स इंडिया लि. कंपनीचे आवारात दि. 10 ते 23 फेब्रुवारी 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत पाहणेसाठी उपलब्ध आहे. या लिलावाची अपसेट प्राईज प्रतिब्रास रु. 400/- प्रमाणे एकुण रक्कम रु. 1,50,00,000/- (रुपये एक कोटी पन्नास लाख) निश्चित करणेत आलेली आहे. लिलावासाठीच्या इतर अटी/शर्ती  किंवा इतर माहितीसाठी इच्छुक लोकांनी तहसिल कार्यालय फलटण व उपविभागीय अधिकारी,कार्यालय फलटण. यांचे कार्यालयाशी संर्पक साधवा. सदर दिवशी गौणखनिज लिलावात न गेलेस दि. 25/02/2020 रोजी सकाळी 11:00 वाजता लिलावाची दुसरी फेरी घेण्यात येईल. सदर दिवशीही लिलावप्रक्रियेत डबरमुरुम लिलावात न गेल्यास दि. 26/02/2020 रोजी सकाळी11:00 वाजता लिलावाची तिसरी फेरी घेण्यात  येईल. असे आर.सी पाटील प्र. तहसिलदार फलटण यांनी कळविले आहे.

No comments