Header Ads

किल्ले प्रतापगड येथे जिल्हा परिषदेच्यावतीने शिवजयंती साजरी satara

सातारा : किल्ले प्रतापगड येथे जिल्हा परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली. सुरुवातीला  सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांचे हस्ते अभिषेक व महापूजा संपन्न झाली. नंतर भवानी माता मंदिरासमोरील ध्वजारोहण सोहळा पार पडला.  यावेळी झांजपथक व ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळा पार पडला. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ ध्वजारोहण व शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सर्व विषय समिती सभापती,पंचायत समिती सभापती, व सर्व अधिकारी ,विविध जिल्हा परिषद सदस्यांनी पुष्पहार अर्पण केला. उपशिक्षक नितिन मोहिते व प्रकाश कदम यांचे शिवचरित्रपर व्याख्यान झाले. त्यांचप्रमाणे विविध शालेय सांस्कृतिक कार्यक्रम व शाहिरी पोवड्यांचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. कार्यक्रमास मंगेश धुमाळ, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, मानसिंराव जगदाळे,सभापती,शिक्षण व अर्थ समिती सभापती, कल्पना खाडे, समाजकल्याण सभापती सोनालीताई पोळ तसेच विविध पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे विभागप्रमुख तसेच सर्व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

No comments