Header Ads

महत्वाची बातमी : साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल satara

सातारा : खेडशिवापूर ता. हवेली जि. पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील खेडशिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून उद्या दि.16 फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर वाहतुकीचा प्रश्न अथवा कोंडी निर्माण होवू नये याकरीता कोल्हापूर बाजुकडून पुणे बाजुकडे जाणारी वाहने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधिनियम कल 33 (1) (ब) नुसार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खालील मार्गाने वळविण्यात आली आहेत. सातारा वाढे फाटा-वाठार स्टेशन-फलटण-लोणंद मार्गे पुणे, जोशी विहिर वाठार मार्गे लोणंद-निरा-जेजुरी मार्गे पुणे, खंडाळा-लोणंद मार्गे पुणे, शिरवळ-लोणंद मार्गे-निरा-जेजुरी मार्गे पुणे, वाई-शहाबाग फाटा-ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, वाई-एमआयडीसी फाटा मार्गे शहाबाग फाटा-ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, अजवड वाहने वाढे फाटा मार्गे वाठार-लोणंद मार्गे पुण्याकडे जातील.

No comments