Header Ads

जनता बँकेच्या शाहुपुरी शाखेतर्फे रेनॉल्ट ट्रायबर गाडीचे वितरण; अल्प व्याजदराने व त्वरित वाहन तारण कर्ज घ्या : विनोद कुलकर्णी satara

सातारा : जनता सहकारी बँक लि. साताराचे सभासद अभय अंबादास पाखले (रा. शनिवार पेठ) यांना रेनॉल्ट ट्रायबर गाडीचे वितरण बँकेच्या शाहुपुरी शाखेतर्फे भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांच्याहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी बँकेच्यावतीने अत्यल्प व्याजदराच्या वाहन तारण योजनेचा ग्राहकांनी फायदा घ्यावा. बँकेतर्फे अल्प व्याजदराने कर्ज वितरण सुरु आहे, अशी माहिती विनोद कुलकर्णी यांनी यावेळी दिली.

श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले, बँकेच्या शाहुपुरी शाखेचे कामकाज प्रगतीपथावर असून ते कौतुकास्पद आहे. ही बँक सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी कटिबध्द आहे. या आर्थिक वर्षात बँकेच्या 175 सभासदांना चारचाकी व दुचाकी वाहनांचे वितरण केलेले आहे. आजमितीस बँकेकडे 154 कोटी रुपयांच्या ठेवी असून 96 कोटीचे कर्ज वितरण केलेले आहे. सातारावासियांनी दाखविलेल्या विश्वासावरच बँकेने प्रगती साधली असून बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. बँकेचे सभासद अभय पाखले यांनी संचालक सदस्य व अधिका-यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँकेच्या भागधारक पॅनेलचे पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक माधव सारडा, वजीर नदाफ, स्वीकृत संचालक अजित साळुंखे (सर), सेवक संचालक अनिल जठार, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक प्रशासन विभाग मच्छिंद्र जगदाळे, उपव्यवस्थापक कर्ज विभाग सलीम बागवान, शाहुपुरी शाखेचे शाखाधिकारी गिरीश कुलकर्णी इतर अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.

No comments