Header Ads

मे.एशियन पेंट कंपनीत रामराजेंचा आपला कॉन्ट्रॅक्टर लादण्याचा प्रयत्न ; अप्पा खरात व अभिजीत खंडागळे यांचा आरोप satara

सातारा : केसुर्डी, ता.खंडाळा येथे असणाऱ्या एशियन पेंट्स या कंपनीत मे.पी. इंटरप्राईजेस नावाचा पहिला एक कॉन्ट्रॅक्टर होता. तो आमच्यावर लादण्यात आलेला होता. सुदैवाने २८ जानेवारी २०२० रोजी कंपनीने त्याला ही काढून टाकले मात्र त्याच जागेवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वतःचा कॉन्ट्रॅक्टर नेमण्याचा घाट घातला आहे. त्याला माथाडी व फोरक्लिप कामगार यांनी कडाडून विरोध केला आहे. संबंधित कॉन्टॅक्टर रद्द न केल्यास आम्ही सर्व कामगार कुटुंबीयांसमवेत १५ दिवसात सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा आप्पा दयाराम खरात व अभिजीत खंडागळे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिला.

आप्पा खरात पुढे म्हणाले, कॉन्ट्रॅक्टर हा कॉन्ट्रॅक्टर कामगार ऍक्टमध्ये आवश्यक असतो. या कायद्यात प्रचंड पळवाटा होत्या म्हणूनच माथाडी कायदा अस्तित्वात आला, असे असतानाही माथाडी कायद्याची पायमल्ली करून राजकीय नेत्यांनी माथाडीवर कॉन्टॅक्टर नेमण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कॉन्ट्रॅक्टरला प्रति टन १५० किंवा अधिक रुपये टनाचे काम दिले असल्याचे समजते. हा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला दररोज १६ टन गाडीखाली केल्याशिवाय हजेरी देत नाही. आम्हाला प्रति दिवस ६०० रुपये हजेरी असून आमच्याकडून तो २४०० र रुपयांचे काम करून घेत आहे. रामराजे नाईक- निंबाळकर यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ७ फेब्रुवारी २०२० रोजी आम्ही सर्व युनियन व कामगारांनी विरोध केलेला असतानाही कामगार राज्यमंत्री बच्चू कडू- पाटील यांनी संबंधित कंपनी व प्रशासनाला कॉन्ट्रॅक्टरची नोंद करू नये असे आदेश दिलेले असतानाही रामराजे यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या लग्नात कामगार मंत्री कामगार आयुक्त यांची बैठक बोलावून कॉन्ट्रॅक्टर नेमण्याचा घाट घातलेला आहे असे समजते. आमच्या सर्व फोरक्लिप कामगारांना ७ वर्ष होऊनही कामावर न घेतल्यास आणि कॉन्ट्रॅक्टर रद्द न केल्यास १५ दिवसात सर्व कामगार कुटुंबीयांसमवेत सामूहिक आत्महत्या करणार असून त्याला रामराजे व संबंधित कंपनी जबाबदार राहील, असा इशाराही खरात यांनी यावेळी दिला आहे.

No comments