Header Ads

खंबाटकी घाटात चारचाकीने घेतला पेट satara

सातारा : खंबाटकी घाट उतरतना चारचाकी गाडीने महामार्गावरच अचानक पेट घेतला. यात चारचाकी गाडी पूर्णत: जळून खाक झाली. यावेळी घाटातून येणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, चारचाकी वाहन क्रमांक MH11CH1888 ही गाडी खंबाटकी घाट चढून उतरत असताना या गाडीने महामार्गावरच अचानक पेट घेतला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. शॉर्ट सर्किटमुळे किंवा घाट चढताना गाडी खूप गरम झाल्यामुळे या गाडीने पेट घेतला असण्याची शक्यता आहे. संबंधित गाडी ही पाचगणी येथील असल्याची समजते. या गाडीमध्ये फक्त चालक प्रवास करीत होता. त्याला मात्र कोणतीही इजा झाली नाही.गाडीने पेट घेतल्याची खबर वेळे ग्रामस्थांना समजताच गावातील टँकरच्या साहाय्याने ही गाडी विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिलिंद पवार पाटील, जीवन पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न केले. या अपघाता बाबत भुईंज पोलिसांना कळवले असता तात्काळ पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पुढील परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस  ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

No comments