Header Ads

जिल्ह्यातील ९ निर्भय महिलांचा गृहराज्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान satara

सातारा : सातारा जिल्‍ह्यातील विविध क्षेत्रात निर्भयपणे काम करणार्‍या महिलांचे कार्य आदर्शवत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील महिलांनीही पुढे येवून नवनवीन संकल्‍पना राबवाव्‍यात व आपली स्‍वतंत्र ओळख करावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना.शंभूराज देसाई यांनी केले. यावेळी निर्भया पथकाला तीन वाहणांचा लोकार्पण सोहळा पार पडला. दरम्‍यान, जिल्‍ह्यातील ९ निर्भय महिलांना सातारा पोलिस दलाच्यावतीने यावेळी सन्‍मानित करण्यात आले. येथील जिल्‍हा मध्यवर्ती बँकेच्या हॉलमध्ये नुकत्‍याच झालेल्‍या निर्भया महिलांच्या सत्‍कार समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक तेजस्‍वी सातपुते, अप्‍पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्‍थित होते.

ना.शंभुराज देसाई यांनी या पुरस्‍कार वितरण सोहळ्यावेळी ९ महिलांचा गौरव केला. यामध्ये विद्या नारकर, सिमरन मुजावर, जया ठोंबरे, यशोदा यादव, भावना वाडीवे, वैशाली चवाते, अक्षदा रांजणे, सुषमा पवार, दिपाली भादुले यांचा समावेश आहे. संबंधित महिला रिक्षा चालवणे, सर्व्हिसिंग सेंटर, वेल्‍डींग व्‍यवसाय, टेक्‍निशियन, इलेक्‍ट्रीशियन, आधार केंद्र चालवत आहेत. या कार्यक्रमानंतर सातारा पोलिस दलातील निर्भया पथकासाठी तीन बोलेरो वाहने देण्यात आली. त्‍याचा लोकार्पन सोहळा मान्‍यवरांच्या हस्‍ते पार पडला.

No comments