Header Ads

विद्यार्थ्यांसाठी मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करणार : रमेश उबाळे satara

कोरेगाव : जिल्हास्तरीय पोवाडा स्पर्धांसाठी बालाजी कन्स्ट्रक्शनतर्फे ल्हासुरणें जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेतील विद्यार्थ्यांना  रमेश उबाळे यांनी वाटप केले. दरम्यान यावेळी ल्हासुरणें जिल्हा परिषद गटामध्ये बालाजी कन्स्ट्रक्शनच्या वतीने मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचेही यावेळी रमेश उबाळे म्हणाले. जिल्हा पतिषदेच्या वतीने स्व.यशवंतराव चव्हाण  व्यक्तीमत्व विकास  स्पर्धा सन२०१९-२०  आयोजन करण्यात आले असून या स्पर्धाअंतर्गत शाहिरी पोवाडे या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये ल्हासुरणें जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनीना  बालाजी कन्स्ट्रक्शन तर्फे गणवेश रमेश उबाळे वाटप करून या स्पर्धांची माहितीही त्यांनी उपस्थित शिक्षकांकडून घेतली.

यावेळी रमेश उबाळे म्हणाले, केवळ  व्यवसाय करणे हा बालाजी कन्स्ट्रक्शनचा उद्देश नाही.  समाजातील गुणवंत, कलावंताना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना जागृत करणे हा आहे. लवकरच बालाजी कन्स्ट्रक्शनच्या वतीने ल्हासुरणें जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये  मॅराथॉन(धावण्याच्या) स्पर्धा होणार आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करून त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसही देण्यात येणार आहे. सातारा येथे जिल्हा परिषदेच्या वतीने व्यक्तिमत्व विकास अंतर्गत पोवाडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एखादा कलाकार यातून घडू शकतो आपल्या गावचे नाव तो अंतराष्ट्रीय पातळीवरही नेऊ शकतो. ल्हासूरणें गावामधून एखादा कलाकार, खेळाडू घडला पाहिजे हाच बालाजी कन्स्ट्रक्शनचा सेवाभावी हेतू आहे. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना बालाजी कन्स्ट्रक्शनच्या वतीने रमेश उबाळे यांनी शुभेच्छा दिल्या. बालाजी कन्स्ट्रक्शनने गरजू तसेच गरीब घटकातील विदयार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी अंगणवाड्या, शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय शालेय साहित्य मोफत दिले आहे. यावर्षी प्रथमच ग्रामीण भागातही खेळाडू, कलाकार तयार होण्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments