Header Ads

कॉंग्रेसने तक्रार करताच बसस्थानक रस्ता भाजीविक्रेते मुक्त satara

सातारा : सातारा शेती उत्पन्न बाजार समिती समोरील पोवई नाका ते बसस्थानक या रस्त्यावर काही भाजीविक्रेते अनाधिकृतपणे भाजी विक्री करत होते. त्यामुळे आत बसणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांच्या मालाची विक्री न होणे, लोकांना चालताना अडचण निर्माण होणे, वाहतुकीस अडथळा होऊन अपघाताची शक्यता निर्माण होणे अशा अडचणी व समस्या निर्माण होत होत्या. त्या दूर करण्यासाठी कॉंग्रेस महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे यांच्या नेतृत्वखाली शेतकरी व बाजार समितीच्या अधिकृत असणाऱ्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, शाहूपुरी पोलीस ठाणे, वाहतूक शाखा सातारा, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे या अडचणी व समस्या सोडवण्याबाबत तक्रार केली होती.

या तक्रारीला अनुसरून, शाहुपुरी पोलीस ठाण्यात झालेल्या तक्रार निवारण दिनात तक्रारदारांचे म्हणणे शाहूपुरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. तसेच त्याबाबत सातारा वाहतूक शाखेशीही चर्चा केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने बाजार समिती समोरील पोवई नाका ते बसस्थानक हा रस्ता पोलीसांनी भाजीविक्रेते मुक्त केला. त्याबद्दल सुषमा राजेघोरपडे, शेतकरी व व्यापाऱ्यांनी पोलिसांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. हा रस्ता आता नियमितपणे यापुढे भाजीविक्रेते मुक्तचं राहावा अशी मागणी यानिमित्ताने करत आहे. तसेच नगरपालिकेने राधिका रस्त्यावर व सार्वजनिक बांधकाम विभागाने पोवई नाका ते बसस्थानक रस्त्याच्या फुटपाथवर अनाधिकृत भाजीविक्री करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना तिथे बसण्यास अटकाव करावा, त्याबाबत उपाययोजना करावी. आणि तो रस्ता फुटपाथही लवकरात लवकर भाजीविक्रेते मुक्त करावा. अशी देखील मागणी सुषमा राजेघोरपडे यांनी केली आहे.

No comments