Header Ads

आ.शिवेंद्रराजे वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेवून केली विचारपूस satara

सातारा : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडल्याने त्यांना साताऱ्यातील हॉस्टिपटलमध्ये प्राथमिक उपचार करुन मुंबईतील वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही गोष्ट कळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हॉस्पिटलमध्ये जावून त्यांची भेट घेवून त्यांच्या तब्बेतीची माहीती घेतली. यावेळी शिवेंद्रराजेंना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली होती. रात्रीच हृदयरोग तज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी त्यांच्यावर प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर आमदार शिवेंद्रराजेंना बरे वाटू लागले आहे. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आले होते त्यावेळी शिवेंद्रराजे स्वतः गाडीत बसतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्यासोबत सध्या त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे होत्या. मुंबईतील वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान, ही गोष्ट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कळताच त्यांनी तातडीने वांद्रेतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये जावून शिवेंद्रराजेंची भेट घेवून तेथील तज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी ट्विटर हँडेलवरुन शिवेंद्रराजेंची प्रकृती झपाटय़ाने सुधारत असून ते चांगले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

No comments