Header Ads

धार्मिक आधारावर नागरिकत्व मौलाना आझाद यांना मान्य नव्हतं : किशोर बेडकिहाळ satara

सातारा : मौलाना आझाद यांच्याच विचारांचं पाठबळ एनआरसी विरोधी आंदोलनाला आहे. धार्मिक आधारावर नागरिकत्व मौलाना आझाद यांना कधीच मान्य नव्हतं. ते इस्लामचे थोर अभ्यासक होते व त्याचवेळी धर्मनिरपेक्षतेचे कट्टर समर्थक होते असे मत जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केले. आज शाहीनबाग सातारा येथे सुरू असलेल्या एनआरसी, एनपीआर, सीएए विरोधी धरणे आंदोलनात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतिदिनी  आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व आंदोलकांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ हे उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना किशोर बेडकिहाळ म्हणाले, स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षात या देशातले लोक नागरिक म्हणून स्वत:च्या हक्कासाठी लढा देतात ही गोष्ट प्रथमच घडते आहे. आजपर्यंत आपण कामगार, शेतकरी, व्यापारी व कधी जाती तर कधी धार्मिक ओळखीच्या आधारे लढे दिले. नागरिक ही स्वत:ची ओळख आपण पहिल्यांदाच दिलेली आहे. दरम्यान आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सातारा शाहीनबागला भेट दिली. त्यांनी क्रांतिकारी गीत सादर केले. तसेच उदय चव्हाण आणि प्रशांत पोतदार यांनी मनोगते व्यक्त केले.

No comments