Header Ads

आम आदमी पार्टीचा साताऱ्यात २५ रोजी कार्यकर्ता मेळावा; रंगाजी राचुरे च संदीप देसाई यांची उपस्थितीती satara

सातारा : आम आदमी पार्टींने दिल्लीत अभूतपूर्व असे यश संपादित केले. या यशानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी पक्षाच्या वतीने दि. २५ फेब्रुवारी रोजी सातार्‍यात आम आदमी पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील यशानंतर देशतील सर्व राज्यात पक्ष संघठना वाढीसाठी आम आदमी पार्टी राष्ट्र निर्माणासाठी पक्ष वाढीसाठी अभियान राबवणार आहे. या अभियाना अंतर्गत आपण २३ फेब्रुवारी ते २३ मार्च या १ महिन्यात सदस्य नोंदणी करणार आहोत. या अभियानाची संपूर्ण माहिती कार्यकर्त्यांना व्हावी आणि पक्षाची राज्यातील पुढील दिशा काय असावी यासंदर्भात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत सीएमसी कॅपिटल, चोरगे यांचे कार्यालय, तिसरा मजला, जुना आर.टी.ओ चौक, सातारा येथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्य संयोजक रंगाजी राचुरे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणार आहेत. तरी या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आम आदमी पार्टीचे चंद्रशेखर चोरगे, सागर भोगावकर, निवृत्ती शिंदे, इम्तियाज खान, प्रा. चव्हाण, विजयकुमार धोतमल, अमोल चव्हाण, डॉ.मधुकर माने यांनी केले आहे.

No comments